अल्ला तुम हो
ऑडिओ
भजनाचे बोल
- अल्ला तुम हो ईश्वर तुम हो
- तुम्ही हो राम रहीम तुम्ही हो राम रहीम
- येशु तुम हो नानक तुम हो
- झोराष्ट्र भी हो महावीर तुम हो
- गौतम बुद्ध करीम
- मेरे राम मेरे राम राम रहीम
भजनाचा अर्थ
अल्ला, ईश्वर, राम आणि रहीम तुम्ही आहात. तसेच जीझस आणि नानक आहात, तुम्ही झरतुष्ट्र आणि महावीर आहात! तुम्ही भगवान बुद्ध आणि करीम आहात!
स्पष्टीकरण
अल्ला | मुस्लीम लोक निराकार परमेश्वराला अल्ला ह्या नावाने संबोधतात. भगवान म्हणतात ‘अ’ हा शब्द आत्म्याचे आणि ‘ल’ हा शब्द लय ह्या शब्दाचे प्रतिनिधित्व करतो. ह्यांचा अर्थ परमेश्वराशी ऐक्य. |
---|---|
तुम | तू |
हो | आहेस |
ईश्वर | शंकराचे एक नांव, ह्याचा अर्थ स्वामी |
तुम्ही हो | तू आहेस |
राम | प्रभु राम – अर्थ- जो सुखदायक आहे |
रहीम | अल्लाचे अजून एक नांव. त्याचा अर्थ अत्यंत दयाळु आणि करुणामय |
येशु | जीझस ख्राईस्ट (येशु ख्रिस्त) भगवान म्हणतात ‘ये’ म्हणजे एक आणि ‘शु’ म्हणजे मंगल. येशु म्हणजे तेथे केवळ एकच मंगल आहे. ह्यातून असे सूचित होते की परमेश्वर एकच आहे आणि तो सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे. |
नानक | गुरु नानक हे शीख धर्म स्थापन करणाऱ्या १० गुरूंपैकी पहिले गुरु आहेत. नानक शब्द ना + अनक ह्यांच्या संधीमधून तयार होतो. त्याचा अर्थ केवळ ते एक अन्य काही नाही. |
झोराष्ट्र | इराणमधील ईश्वराचा प्रेषित झरतुष्ट्र ह्यांनी झोरास्ट्रीअन (पारशी) धर्माची स्थापना केली. जगामधील सुरुवातीच्या काळात प्रकटीकरण झालेल्या धर्मांपैकी हा एक धर्म. झरतुष्ट्र नावाचा अर्थ ‘सोनेरी तेजस्वी तारा’ असा आहे. |
महावीर | भगवान महावीर जैन धर्माचे संस्थापक. त्यांच्या नावाची फोड अशी करु शकतो- महा – महान आणि वीरचा अर्थ शूर, शौर्यवान |
गौतम बुद्ध | भगवान गौतम बुद्ध, आत्मज्ञानी |
करीम | मुस्लीम लोकं परमेश्वराचे पूजन करताना त्याला ह्या नावाने संबोधतात. ह्या नावाचा अर्थ- थोर मनाचा, उदात्त |
मेरे | माझे |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty