गोविंद रामा
ऑडिओ
भजनाचे बोल
- गोविंद रामा जय जय गोपाल रामा
- माधव रामा जय जय केशव रामा
- दुर्लभ रामा जय जय सुलभ रामा
- एक तू रामा जय जय अनेक तू रामा
अर्थ
प्रभुराम जो परमेश्वराचा अवतार आहे व ते भगवान कृष्णही आहेत, त्यांचा विजय असो. ते माधव आहेत- लक्ष्मीपती आणि केशव- ते त्रिमूर्ती (ब्रह्मा-विष्णू-महेश) आहेत. प्रभूना प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे आणि अत्यंत सोपेही आहे. ते एक आहेत आणि अनेकही आहेत.
दृकश्राव्य चित्रण
स्पष्टीकरण
गोविंद | साधारणतः हे नाव भगवान विष्णुंसाठी, विशेषतः कृष्ण अवतारासाठी वापरले जाते. गो म्हणजे गाय. कृष्णाने गुराख्याची भूमिका केल्यानंतर हे नाव धारण केले आहे. |
---|---|
रामा | प्रभुराम म्हणजे जो सुखकारक आहे. |
जय | विजय |
गोपाला | गो-गाय, पाला-पालन कर्ता, संरक्षक. ह्या नावाचा संबंध कृष्णावताराशी आहे. कारण तेव्हा त्याने गुराख्याची, गुरे राखणार्याची भूमिका केली होती. |
माधव | भगवान विष्णू वा कृष्णाचे अजून एक नाव आहे. मा+धव. मा म्हणजे महालक्ष्मी, जगन्माता. आणि धव म्हणजे पती, लक्ष्मीपती. |
केशव | भगवान विष्णू वा कृष्णाचे एक नाव ह्या शब्दाचा एक अर्थ आहे जो क्लेश दूर करतो. आणि दुसरा अर्थ आहे. ज्याचे काळेभोर, कुरळे असे सुंदर केस आहेत.हा शब्द केश म्हणजे केस ह्या शब्दापासून आला आहे. कृष्णावतारात कृष्णाने केशी या राक्षसाचा वध केला. ते सुध्दा केशव ह्या नावामधून सूचित होते. |
दुर्लभ | प्राप्त करण्यास अत्यंत कठीण |
सुलभ | प्राप्त करण्यास अत्यंत सोपे |
एक | एक |
तू | तू |
अनेक | अनेक |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 1
-
पुढील वाचन