जेव्हा परमेश्वर पृथ्वीतलावर अवतरतो तेव्हा वृक्षवल्ली, पशुपक्षी, मानव त्याच्या वैश्विक आणि दिव्य प्रेमामध्ये न्हाऊन निघतात. सर्वत्र आनंद आणि सुसंवादित्व आणि परिवर्तनाचा चमत्कार दिसून येतो. २३ नोव्हेंबर १९२६ ह्या मंगल दिनी, आपल्या मध्ये राहण्यासाठी जेव्हा भगवान श्री सत्यसाई बाबा अवतार घेऊन भूतलावर आले तेव्हापासून आठ दशकाहून अधिक काळ भुतलावर हेच घडले.
बालसाई म्हणजे आपल्या प्रिय प्रभुंच्या जन्म आणि बालपणीच्या कथांचा संग्रह आहे. त्यामध्ये बालसत्याने त्याच्या महतकार्याचे बीजारोपण कसे केले हे दर्शवले आहे. ‘माझे जीवन हाच माझा संदेश’ असे घोषित करुन ते त्यांची शिकवण जगले.
बालविकास गुरुंनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वयानुसार या संग्रहातील कथांची निवड करावी. ह्या परमेश्वराच्या जीवनातील केवळ कथा नव्हेत तर ह्यामधून आपण जीवनमूल्यांचे धडे घेऊ शकतो. हे ह्या कथांचे वेगळेपण आहे. ह्या कथांचा अविभाज्य भाग असलेल्या जीवनमूल्यांचा ठळकपणे उल्लेख केला पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या आकलनाचे मूल्यांकन करण्यासाठी बालविकास गुरूंनी कोडी (quiz) विभागातील प्रश्न निवडले पाहिजेत.