शांती, सत्य आणि धर्माच्या पाठोपाठ येते कारण तो एक अनुभव आहे. मनुष्याला शांतीचा साक्षात्कार होण्यासाठी कठोर प्रयत्न करण्याची गरज नाही. फक्त त्याने त्याच्या उच्चार आणि विचारांमध्ये सत्याची आणि आचरणामध्ये धर्माची कास धरली की त्याची परिणती शांती मध्ये होते. मनुष्याला शांती प्राप्त करण्यासाठी, मनावर नियंत्रण ठेवण्यास धर्मग्रंथ प्रेरित करतात. जेव्हा मन नियंत्रणात असते तेव्हा ते शांत असते, निश्चल असते. अशी अवस्था हीच खरी शांती होय.
बाह्य वस्तूंपासून मिळणारी शांती वा आनंद चिरकाल टिकणारा नसतो, हे पिढ्यान्-पिढ्याच्या अनुभवांमधून निदर्शनास येते. ते एखाद्या मृगजळासारखे आहे. शांतीचा खरा स्त्रोत मनुष्याच्या अंतरात आहे आणि केवळ ही आंतरिक शांती त्याला आनंद प्रदान करू शकते. शांतीशिवाय आनंद असू शकत नाही, असे संत त्यागराजांनी त्यांच्या एका गीतामधून घोषित केले आहे.
तुम्ही चंदनाच्या झाडासारखे असायला हवे जे त्याला तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कुऱ्हाडीलाही त्याचा सुगंध देते. अगरबत्ती पेटवल्यानंतर, स्वतःला जाळून संपवते परंतु सभोवताली सुगंध पसरवते. त्याचप्रमाणे, सच्चा साधकाने आणि सच्चा भक्ताने कोणत्याही परिस्थितीत स्वतःची शांती अबाधित ठेवून आनंद पसरवला पाहिजे.
क्रोधावर नियंत्रण विषयक गोष्टीचा येथे समावेश केला आहे. पुढील वर्षांमध्ये, आपल्या अंतर्गत शत्रूवर विजय कसा मिळवायचा हे आपण अधिक तपशीलात पाहू या.