अष्टोत्तरा [ ५५ – १०८] श्लोका
व्हिडिओ
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- ॐ श्री साई अनन्तनुतकर्तृने नमः।
अखंड स्तविल्या जाणाऱ्या श्री साईना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई आदिपुरुषाय नमः ।
आदिपुरुष असणाऱ्या श्री साईंना साईंना साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई आदिशक्तये नमः ।
आदिशक्ती असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई अपरूपशक्तीने नमः ।
अद्भुत् दैवी शक्ती असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो
- ॐ श्री साई अव्यक्तरुपिणे नमः ।
अव्यक्त (निराकार) रूप असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई काम-क्रोध-ध्वंसिने नमः ।
वासना व क्रोध यांचा नाश करणाऱ्या श्रो साईंना आमचा नमस्कार असो
- ॐ श्री साई कनकांबर धारिणे नमः ।
सुवर्णवस्त्र (भगवे वस्त्र ) धारण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो
- ॐ श्री साई अद्भुतचर्याय नमः |
ज्यांच्या लीला आश्चर्यकारक आहेत त्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई आपदबांधवाय नमः ।
संकटकाळात बंधुवत सहाय्य करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो
- ॐ भी साई प्रेमात्मने नमः ।
प्रेमस्वरुप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई प्रेममूर्तये नमः ।
प्रेम मूर्ती श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई प्रेमप्रदाय नमः ।
सर्वांना प्रेम देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई प्रियाय नमः ।
सर्वांना प्रिय असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई भक्तप्रियाय नमः ।
सर्व भक्तांना प्रिय असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई भक्तमंदराय नमः।
भक्तांसाठी कल्पवृक्षाप्रमाणे असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई भक्तजन हृदयविहाराय नमः ।
भक्तांच्या हृदयात विहार करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई भक्तजन हृदयालयाय नमः ।
भक्तांच्या हृदयात निवास करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई भक्तपराधीनाय नमः ।
भक्तांच्या भक्तीने बद्ध झालेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई भक्तिज्ञानप्रदीपाय नमः ।
भक्ती व ज्ञान यांचा दीप प्रज्वलित करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई भक्तीज्ञान प्रदाय नमः ।
भक्ती व ज्ञान देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सुज्ञान मार्गदर्शकाय नमः।
यथार्थ ज्ञान प्राप्त होण्यासाठी मार्ग दाखवणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई ज्ञानस्वरूपाय नमः।
जे प्रत्यक्ष ज्ञानस्वरुप आहेत त्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई गीताबोधकाय नमः ।
श्रीमदभगवदगीतेचा बोध करुन देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई ज्ञानसिद्धिदाय नमः ।
आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सुंदररूपाय नमः ।
ज्यांचे रूप अत्यंत सुंदर आहे अशा श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई पुण्यपुरुषाय नमः ।
पवित्रतेचे मूर्त स्वरूपच अशा श्री साईंना आमचा नमस्कार असो
- ॐ श्री साई फलप्रदाय नमः ।
आपल्या कर्माचे फल देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो
- ॐ श्री साई पुरुषोत्तमाय नमः ।
सर्वश्रेष्ठ पुरुष असणाऱ्या (देहरुपी पुरात निवास करणाऱ्या) श्री साईंना
आमचा नमस्कार असो. - ॐ श्री साई पुराणपुरुषाय नमः ।
खूप प्राचीन पुरुष (आदिपुरुष) असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई अतीताय नमः ।
ज्यांचे स्वरुप जाणिवेच्या पलिकडे आहे त्या श्री साईंना आमचा नमस्कार
असो. - ॐ श्री साई कालातीताय नमः।
ज्यांचे स्वरुप कालाच्या मर्यादेपलिकडे आहे त्या श्री साईंना आमचा
नमस्कार असो. - ॐ श्री साई सिद्धिरूपाय नमः ।
सर्व सिद्धींचे मूर्तरूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सिद्धिसंकल्पाय नमः|
ज्यांचा ईश्वरी संकल्प तय सिद होतो त्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई आरोग्यप्रदाय नमः।
चांगले आरोग्य प्रदान पारणान्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई अन्नवस्त्रदाय नमः।
अन्न आणि वस्त्र देणान्या की साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई संसारदु:ख क्षयकराय नमः।
सांसारिक दु:खांचा नाश करणाच्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सर्वाभीष्टप्रदाय नमः ।
सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई कल्याण गुणाय नमः।
कल्याणकारी गुण असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई कर्मध्वंसिने नमः।
कर्मबंधाचा नाश करणान्या श्री साईंना आमचा नमस्कार असो
- ॐ श्री साई साधुमानसशोभिताय नमः ।
साधकांचे अंतःकरण प्रकाशमान करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार
असो. - ॐ श्री साई सर्वमतसम्मताय नमः ।
सर्व धर्मांना संमती देणाऱ्या श्री साईंना आमधा नमस्कार असो.
- ॐ श्री साई साधुमानस परिशोधकाय नमः ।
साधकांच्या अंत:करणाची शुद्धी करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई साधकानुग्रह वटवृक्षप्रतिष्ठापकाय नमः
साधकांवर कृपा करण्यासाठी वटवृक्षाची स्थापना करणान्या श्री साईंना
आमचा नमस्कार असो. - ॐ श्री साई सकलसंशयहराय नमः।
सर्व संशयांचे निवारण करणाऱ्या श्री साईंना आमच्या नमस्कार असो.
- ॐ श्री साई सकलतत्त्वयोधकाय नमः ।
सर्व ज्ञानांचे सारभूत तत्त्व उपदेशिणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई योगिश्वराय नमः |
जे सर्व योगिजनांचे स्वामी असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई योगीन्द्रवंदिताय नमः|
श्रेष्ठ योगिजन ज्यांना वंदन करतात त्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सर्व मंगलकाराय नमः |
सर्वांचे मंगल करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.|
- ॐ श्री साई सर्व सिद्धिप्रदाय नमः|
सर्वप्रकारचे कौशल्य व नैपुष्य देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.|
- ॐ श्री साई आपन्निवारिणे नमः ।
सर्व आपत्ती दूर करणाऱ्या श्री साईंना श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई आर्तिहराय नमः ।।
सर्व (शारीरिक व मानसिक) दुखांचा नाश करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई शांतमूर्तये नमः ।
शांतीचे मूर्त रूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई सुलभप्रसन्नाय नमः ।
सहज प्रसन्न होणाऱ्या श्री साईना साईंना आमचा नमस्कार असो.
- ॐ श्री साई भगवान् श्री सत्य साईबाबाय नम: |
भगवान् श्री सत्य साईबाबांना आमचा नमस्कार असो.
ज्यामध्ये खालील सहा गुण पूर्णत्वाने विद्यमान असतात तो भगवंत होय.
- यश-कीर्ती
- श्री – ऐषर्य
- औदार्य – उदारता
- ज्ञान – ज्ञान
- वैराग्य – अनासव्ती
- ऐश्वर्य – सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ
जो प्रत्येक जीवाचा प्रारंभ आणि शेवट तसेच जन्म आणि मृत्यू जाणतो तो. म्हणून या नवरत्नमालेची सांगता भगवंताच्या षडेश्वरयाला पुष्टी देणारी आहे.
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0