दिनयामिन्यौ सायं प्रातः
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- दिनयामिन्यौ सायं प्रातः
- शिशिरवसन्तौ पुनरायातः
- कालः क्रीडति गच्छत्यायुस्तदपि
- न मुञ्चत्याशावायुः
अर्थ:
रात्र आणि दिवस, प्रभात आणि तिन्हीसांजा, शिशिर आणि वसंत हे सर्व क्षणकालासाठी जगाच्या रंगमंचावर येतात आणि जातात. काळ आपल्याला अशा तऱ्हेने खेळवतो आणि फसवतो. आपला जीवनकालही कमी कमी होत असतो. असे असूनही आपण जरा सुद्धा आपल्या इच्छांना धरुन ठेवणे सोडत नाही. इच्छांची आपल्यावरील पकड ढिली होऊ देत नाही.
स्पष्टीकरण
दिनयामिन्यौ | दिवस+रात्र |
---|---|
सायं | संध्या, तिन्हीसांजा |
प्रातः | सकाळ, प्रभात |
शिशिर | हिवाळा, शिशिर ऋतु |
वसन्तौ | वसंत ऋतु |
पुनः | पुन्हा |
आयतः | आले आहेत, आगमन झाले आहे |
कालः | काळाचा स्वामी |
क्रीडति | खेळतो |
गच्छति | दूर जाणे |
आयुः | जीवन / आयुर्मान |
तदपि | तरीही |
न | ना |
मञ्चति | सोडून देणे |
आशा | इच्छा |
वायुः | वायु (इच्छांचे वादळ त्याची पकड सुटु देत नाही) |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 1
-
उपक्रम