गुरुपद रंजन राम
ऑडिओ
भजनाचे बोल
- गुरुपद रंजन राम जय जय
- बंध विमोचन राजीव लोचन
- अभय कराम्बुज राम जय जय
- (जय जय राम जय जय राम सीता राम)
भजनाचा अर्थ
जीवनातील गुंतागुंत सोडवून आणि बंधमुक्त करुन मुक्तीच्या दिशेने नेणारे राजीव लोचन, सुखदायी प्रभु राम ह्यांचा जयजयकार असो! ज्यांच्या चरण कमलांची भक्ती केल्याने भय दूर होते अशा परममार्गदर्शक प्रभुरामांचा जयजयकार असो! सीतेचे स्वामी प्रभुराम आणि भगवान साईराम ह्यांचा जयजयकार असो!
स्पष्टीकरण
गुरु | गु- अज्ञानाचा अंधःकार रु- दूर करणारा |
---|---|
पदरंजन | पद – चरण, रंजन – सुखदायक |
राम | प्रभु राम शब्दशः अर्थ – सुखदायक |
जय | जयजयकार |
बंध | पाश, बंध |
विमोचन | पासून मुक्तता |
राजीव | कमल |
लोचन | नेत्र |
अभय | निर्भय |
कराम्बुज | कमलहस्त |
सीताराम | सीता – सीता माता, राम – प्रभु राम, प्रभु राम – सीतामातेचा पती आहेत म्हणून हे नाम प्रचलित आहे. |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0