हे माधवा हे मधुसूदना
ऑडिओ
भजनाचे बोल
- हे माधवा हे मधुसूदना
- दामोदरा हे मुरलीधरा
- मनमोहना हे यदुनंदना
- दीनावना भव भय भंजना
भजनाचा अर्थ
मधुसूदना, यदुनंदन, प्रिय प्रभु, हे कृष्णा तू तुझ्या भक्तांवर करुणा करुन त्यांचे भव भय हरण करतोस
स्पष्टीकरण
माधव | भगवान विष्णु वा कृष्णाचे अजून एक नाम. मा + धव (‘मा’ चा संदर्भ लक्ष्मीशी आहे आणि ‘धव’ म्हणजे पती -‘लक्ष्मीपती’) |
---|---|
मधुसूदना | मधु – राक्षसाचे नांव, सूदन – वध करणे. मधुसूदन – कृष्णाचे एक नांव, मधु नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने वध केला हे ह्या नावामधून सूचित होते |
दामोदर | दामोदर हे कृष्णाचे एक नांव आहे. ह्या नावाचा संदर्भ कृष्ण लहान असताना यशोदामैया त्याला दोरीने उखळाला बांधून ठेवत असे त्याच्याशी आहे. दाम म्हणजे दोरी आणि उदरम् म्हणजे पोट. |
मुरलीधरा | मुरली – बासरी, धर – धारण करणारा. भगवान कृष्ण मुरली वाजवत असल्यामुळे त्यांना ह्या नावाने संबोधले जाते. |
मनमोहना | मन – मन, मोहना – मोहिनी घालणारा |
यदुनंदना | यदु – एक राजा ज्याच्या नावाने यदुवंश ओळखला जातो. नंदन – पुत्र, यदुवंशातील पुत्र म्हणून कृष्णाचा जन्म झाल्यामुळे त्याला यदुनंदन म्हणतात. |
दीनावना | दीनजन |
भव | भौतिक, सांसारिक |
भय | भय,भीती |
भंजना | दूर करणारा |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
ACTIVITY
-
FURTHER READING