राम हरे साई कृष्ण हरे
ऑडिओ
भजनाचे बोल
- राम हरे साई कृष्ण हरे
- सर्व धर्म प्रिय साई हरे
- अल्ला ईश्वर साई हरे
- गुरु नानक येशु बुद्ध हरे
- झोराष्ट्र महावीर साई हरे
- सर्व धर्म प्रिय साई हरे
भजनाचा अर्थ
हे सर्व धर्म भजन आहे. राम, कृष्ण, अल्ला, ईश्वर, गुरु नानक, जीझस ख्राईस्ट, बुद्ध, झोराष्ट्र आणि महावीर ह्या परमेश्वराच्या सर्व नामांपुढे आम्ही नतमस्तक आहोत. आपले भगवान श्री सत्यसाई नेहमी सर्वधर्म ऐक्यावर भर देतात. आपल्या प्रिय प्रभुंना सर्व धर्म सारखेच प्रिय आहेत आणि ते सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व करतात.
स्पष्टीकरण
राम | प्रभु राम जो सुखदायी आहे |
---|---|
साई | आपल्या प्रिय प्रभूंचे नांव ह्याचा अर्थ स्वामी |
कृष्ण | भगवान कृष्ण. कृष्ण ह्या शब्दाची व्युत्पत्ती कर्ष ह्या शब्दातून झाली आहे; त्याचा अर्थ आकर्षित करणे वा आकर्षणाने जसे आपण ओढले जातो. |
सर्वधर्म | सर्व धर्म |
प्रिय | प्रिय |
अल्ला | मुस्लिम लोकं निराकार परमेश्वरास अल्ला ह्या नावाने पुकारतात. भगवान म्हणतात, ‘अ’ हा शब्द आत्म्याचे आणि ‘ल’ हा शब्द लय ह्या शब्दाचे प्रतिनिधित्व करतो. ह्याचा अर्थ आत्म्याशी ऐक्य. |
ईश्वर | ह्या शब्दाचा अर्थ स्वामी, शंकराचे एक नांव |
गुरु नानक | गुरु नानक हे शीख धर्म स्थापन करणाऱ्या २० गुरूंपैकी पहिले गुरु आहेत. |
येशू | जीझस ख्राईस्ट (येशु ख्रिस्त) भगवान म्हणतात ‘ये’ म्हणजे एक आणि ‘शु’ म्हणजे मंगल. येशु म्हणजे तेथे केवळ एकच मंगल आहे. ह्यातून असे सूचित होते की परमेश्वर एकच आहे आणि तो सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे. |
बुद्ध | भगवान बुद्ध -ह्याचा अर्थ- आत्मज्ञानी |
झोराष्ट्र | इराणमधील ईश्वराचा प्रेषित झरतुष्ट्र ह्यांनी झोरास्ट्रीअन (पारशी) धर्माची स्थापना केली. जगामधील सुरुवातीच्या काळात प्रकटीकरण झालेल्या धर्मांपैकी हा एक धर्म. झरतुष्ट्र नावाचा अर्थ ‘सोनेरी तेजस्वी तारा’ असा आहे. |
महावीर | भगवान महावीर जैन धर्माचे संस्थापक. त्यांच्या नावाची फोड अशी करु शकतो- महा – महान आणि वीरचा अर्थ शूर, शौर्यवान |
बाबा | शब्दशः अर्थ पिता. ही संज्ञा अनेकदा भगवान बाबांसाठी वापरली जाते |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty