खऱ्या अर्थाने सुट्टी कशी घालवावी
माझ्या पद्धतीने म्हटले तर लोकांनी दिवाळीच्या सुट्टीच्या दरम्यान, घराची आणि मनाची (हृदयाची) स्वच्छता करायला हवी. त्याचबरोबर मुलांसाठी, सोपे, उद्बोधक मनोरंजनाचे मार्ग निवडले पाहिजेत. मला माहिती आहे की फटाके हा मुलांसाठी आनंदाचा विषय आहे. परंतु त्यांना तसे वाटते कारण आपण मोठ्यांनीच त्यांना ती सवय लावली आहे. परंतु अज्ञानी आफ्रिकन मुलांना फटाके हवे असतील किंवा त्यांना त्याचे कौतुक असेल हे मला माहित नाही. त्याऐवजी त्यांच्याकडे नृत्य करतात. मुलांसाठी खेळ वा सहली ह्याहुन अधिक चांगले आरोग्यकारक काय असू शकेल? बाजारातून आणलेल्या, त्यांच्या पोषणमूल्यांविषयी शंका असणाऱ्या मिठायांपेक्षा ताजी फळे वा सुका मेवा मुलांना द्यावा. गरीब असो वा श्रीमंत दोन्ही घरातील मुलांना घराच्या स्वच्छतेचे व घराची रंगरंगोटी स्वतः करण्याचे प्रशिक्षणही देता येऊ शकते. मुलांना श्रमाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व समजावून देण्यासाठी त्यांच्याशी गोड बोलून सांगावे. सुट्टीमध्येच ह्याची सुरुवात करावी. परंतु मला ज्या मुद्यावर विशेष भर द्यायचा आहे तो असा आहे की फटाक्यांवर होणारा खर्च टाळला तर संपूर्ण रक्कम नाही परंतु त्यातील काही भाग गरजू मुलांच्या सेवेसाठी वापरला गेला पाहिजे. देशातील गोरगरीबांचा विचार करणे व त्यांना सहयोग देणे, लहान थोर सर्वांसाठीच ह्याहुन अधिक मोठा आनंद कोणता असू शकतो.
चांगले आणि सुखकारक (श्रेयस आणि प्रेयस)
निवड तुमची आहे.
चांगले ही एक गोष्ट आहे तर सुखकारक ही दुसरी गोष्ट आहे. ह्या दोन्हीचे वेगळे हेतू मनुष्यास भुरळ घालतात. ह्या दोन्हीपैकी जो चांगल्याला धरुन ठेवतो, ते त्याच्यासाठी चांगले असते आणि जो सुखकारक गोष्टीस धरुन ठेवतो त्यांच्यासाठी अंततः ते चुकीचे ठरते.
श्रेयस आणि प्रेयस दोन्ही गोष्टी मनुष्याच्या समोर येतात. बुद्धिमान मनुष्य दोन्हीवर विचार करतो व दोन्हींमधील भेद समजून घेतो. विवेकबुद्धीने तो प्रेयस न निवडता श्रेयस निवडतो. तर मूर्ख व्यक्ती स्वतःच्या भौतिक सुखांसाठी प्रेयसची निवड करते.
यम: हे नचिकेता, तू ह्यावर सखोल विचार आणि परिक्षण करुन, जे सुखकारक आनंद देणारे वाटते वा तसे भासते ते तू नकारलेस. धनदौलतीकडे घेऊन जाणारा मार्ग तू स्वीकारला नाहीस. ह्या मार्गाचा स्वीकार करुन अनेकांचा नाश होतो.
कठोपनिषद
दयाळूपणा
विचाराधीन होऊन मी प्रश्न केला वास्तवात चांगले काय असते? न्या
यालयाने म्हटले “आशा.”
विद्यालयाने म्हटले “ज्ञान.”
ज्ञानवंताने म्हटले “सत्य.”
मूढ व्यक्तीने म्हटले “भौतिक सुख.”
युवतीने म्हटले “प्रेम.”
परिचराने म्हटले “सौंदर्य.”
स्वप्न पाहणाऱ्याने म्हटले “स्वातंत्र्य.”
ऋषिने म्हटले “गृह.”
सैनिकाने म्हटले “कीर्ति.”
दृष्ट्याने म्हटले “न्यायबुद्धी.”
जॉन बॉयल ओ’ रेलीय
मानसिक शक्ती
प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात मानसिक क्षमता असते. प्रत्येकाने ह्या मानसिक शक्तीची उच्चतम क्षमता जाणली पाहिजे. हे सर्वांचे कर्तव्य आहे. जर त्यांनी त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त आध्यात्मिक शक्तीस जाणून घेण्याचा दृढ निश्चय केला तर सर्वजण सारखेच सक्षम आहेत. जरी देहाच्या बरोबर जाणीव विकसित होत असते तरी जेव्हा शरीराची वाढ थांबते त्यानंतरही जाणीव विकसित होत राहते. ती विकसित होणे थांबत नाही. बुद्धी, नैतिक शक्ती, धार्मिक भावना, सौंदर्यदृष्टि ह्यांचा वृध्दावस्थेतही विकास सुरु असतो.
एलेक्सिस केरल
सांस्कृतिक सौंदर्याची जाण
सौंदर्य जाणणे वा अनुभवणे ह्याची तीव्र इच्छा असणे ही केवळ तीव्र इच्छा नाही तर ती जीवनाचा श्वास आहे.
मी अनेक यशस्वी माणसे पाहिली आहेत, संपत्तीत लोळणारी, विजयाच्या जल्लोषात वाहून जाणारी माणसे पाहिली आहेत. परंतु मला त्यांच्यामध्ये सौंदर्याची जाण असल्याचे आढळले नाही. संगीतात त्यांना रस नसतो. कविता त्यांना रोमांचित करत नाहीत. त्यांना जगामध्ये सुसंवादित्व जाणवत नाही. ना त्यांना त्यांच्या सभोवतालच्या अद्भुत दृश्याची जाण असते.
जर आपल्यामध्ये सौंदर्याची जाण जागृत झाली नसेल तर आपण आपल्या जागृत मनाचा विकास करु शकलो नाही वा आपण त्या अनियंत्रित मनाचे, केवळ तर्क, हिशोबीपणा, क्लुप्त्या करणाऱ्या मनाचे गुलाम आहोत हेच दिसून येते.
तुम्ही एखाद्यास, तुमच्या शब्दांमधून जेवढ्या प्रभावीपणे तो चुकीचा आहे असे सांगू शकता तेवढ्याच प्रभावीपणे तुम्ही त्याला तुमच्या दृष्टीक्षेपातून, स्वरातून वा हावभावातून तो चुकीचा आहे हे सांगू शकता. जर तुम्ही त्याला तो चुकीचा आहे असे सांगितले तर तुमच्या मताशी त्याने सहमती दर्शवावी अशी तुमची इच्छा असते का? नाही, तसे होणार नाही कारण तुम्ही थेट त्याच्या बुध्दिमत्तेवर, तर्कशक्तीवर, अहंकारावर आणि आत्मसन्मानावर आघात केला आहे.
त्या विवादातून चांगले प्राप्त करण्यासाठी एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे विवाद टाळा.
इच्छा ठेवणे चुकीचे आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु इच्छांचा त्याग करणे म्हणजे काय?
असे केल्यास जीवन कसे सुरु राहणार? मग तुमच्याकडे मालमत्ता नसायला हवी. तुमच्याकडे आवश्यक वस्तु वा चैनीच्या वस्तुही नसायला हव्यात. तुम्हाला जे काही हवे आहे त्याहून अधिक प्राप्त करुन घ्या. परंतु सत्य जाणून, त्याचा बोध करुन घ्या. धनदौलत कोणाच्याही मालकीची नाही. मालकीहक्क, ताबा, अधिकार ह्या कल्पना मनातून काढून टाका. सर्वकाही परमेश्वराच्या मालकीचे आहे.
विवेकानंद
मनाला उच्च आणि उदात्त विचारांनी भरुन टाका. दिवसानुदिवस त्यांचे श्रवण करा. महिनोन
महीने त्यावर चिंतन करा. अपयश आले तर खचून जाऊ नका. ती स्वाभाविक गोष्ट आहे. अपयश हे जीवनातील सौंदर्य आहे. त्याच्याशिवाय जीवनाला अर्थ नाही. जर जीवनात संघर्ष नसेल तर जीवन कवडीमोल बनते. जीवनातील काव्य हरपते
मस्तक आणि हस्त ह्यांचे सहकार्य,खरतर ही गोष्ट आपल्याला हवी आहे. तेथे अमर्याद भावनांना वाव आहे. तसेच अमर्याद संस्कार आणि तर्कांना सुद्धा वाव आहे. कोणत्याही मर्यादांशिवाय त्यांना एकत्र येऊ दे.
विवेकानंद
जर एखाद्यास आपल्याला काय हवे आहे हे समजल असेल आणि तो त्याचा पाठपुरावा करत असेल तर त्याने खालील ४ गोष्टी करायला शिकले पाहिजे.
विचारांमध्ये संभ्रम नसावा सुस्पष्टता असावी.
हृदयामध्ये सहबांधवांसाठी सच्चा प्रेमभाव असावा.
कार्यामागील हेतु शुध्द आणि प्रामाणिक असावा.
परमेश्वर आणि स्वर्ग ह्यावर दृढ विश्वास असायला हवा.
व्हेनडाईक
हे जग माझ्यासाठी आहे, मी जगासाठी नाही. चांगले आणि वाईट आपले गुलाम आहेत,आपण त्यांचे गुलाम नाही. आहे त्या ठिकाणी राहणे व प्रगती न करणे ही पशुंची स्वभावप्रवृत्ती आहे तर चांगल्याचा शोध घेणे आणि वाईट टाळणे ही मानवाची स्वभावप्रवृत्ती आहे. आणि चांगले वाईट दोन्हींचा शोध न घेता चिरंतन आनंदात राहणे ही परमेश्वराची स्वभावप्रवृत्ती आहे. चला आपणही परमेश्वर होऊ या. हृदयाला महासागरासारखे विशाल बनवा. जगातील सर्व क्षुल्ल्क गोष्टींच्या पलीकडेजा. वाईटाकडे पाहूनही आनंदात राहा. तुमच्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही हे जाणून जस एखाद्या चित्राकडे पाहता तसं जगाकडे पाहा. त्याकडे शांत आत्मसंतोषाने पाहा. चांगले आणि वाईट ह्याकडे समदृष्टीने पाहा. दोन्ही केवळ परमेश्वाच्या खेळाचाच भाग आहे. त्यांचा आनंद घ्या.