वर्तुळ खेळ मुलांना त्यांच्यातील शक्ती, उत्साह अर्थपूर्ण रीतीने मार्गस्थ करण्यासाठी आणि आपल्या सवंगड्यांबरोबर, मित्रमंडळींबरोबर प्रभावीपणे संपर्कं साधण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करुन देतात.
त्यामुळे मुलांची समग्र प्रगती आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळते. त्याकरिता इतरांमध्ये मिसळण्याची संधी मिळाल्यामुळे ते लाजाळूपणा, भावनांना आतल्या आत दाबून ठेवणे आणि संकोच यावर मात करु शकतात. इतरांचे ऐकून घेणे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचे त्यांचे कौशल्य वाढीस लागते आणि समन्वय, तालबद्धता, हस्तकौशल्य, चपळता सुधारल्यामुळे, सूक्ष्म हालचालींचे कौशल्य, हातोटी याचे संवर्धन होण्यासाठी त्याची मदत होते.
इतरांच्या मतांचा ते आदर करायला शिकतात आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांना समर्थपणे तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली सामजिक कौशल्ये पण ते आत्मसात करतात. यातूनच एकमेकांना संधी देत असताना (खेळामध्ये) समजूतदारपणा, चिकाटी, सहनशीलता इत्यादी गुण त्यांच्या मनावर बिंबवले जातात.
वर्तुळ खेळांमध्ये गटातील मुलांमध्ये काही प्रमाणात जवळीक निर्माण होण्यासाठी हा शब्द काढावा, प्रोत्साहन मिळते. त्यामुळे मुलांना नियंत्रित करणे गुरुंना सोपे जाते आणि वर्तुळात बसल्यामुळे एकमेकांना पाहणे आणि ऐकणे मुलांना पण सहज शक्य होते. संगीताचे, ठेक्याचे खेळ मुलांना मनोरंजक वाटतात, पण त्याचबरोबर, त्यातील ठेका व लयबद्धतेमुळे मुलांना तालाशी समन्वय साधण्यास मदत होते. तसेच त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते.
रोजच्या कंटाळवाण्या दिनचर्येत बदल घडतो. त्यामुळे वर्तुळ खेळांमुळे मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो.