शान्ताकारं
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- शान्ताकारं भुजगशयनं
- पद्मनाभं सुरेशं
- विश्वाधारं गगनसदृशं
- मेघवर्णं शुभाङ्गम्
- लक्ष्मीकान्तं कमलनयनं
- योगिभिर्ध्यानगम्यन्ं ध्यानगम्यं
- वन्दे विष्णुं भवभयहरं
- सर्वलोकैकनाथम्
अर्थ
जो सतत शात आहे, शेषशायी आहे, ज्याच्या नाभीतून सृजनशक्तीचे कमल फुलले आहे, जो देवाधिदेव आहे, जो विश्वाचा आधार आहे आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे, मेघाच्या रंगाचा व आकर्षक सौंदर्याचा आहे. लक्ष्मीपती व कमलनेत्र असा तो योगिजनांना ध्यानामध्ये आविर्भूत होतो. जो संसाराची भीती नाहीशी करतो. अशा सर्व विश्वाचा प्रभु असणाऱ्या विष्णूला मी वंदन करतो/ करते.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
शान्ताकारं | जो शांतीचे साकार स्वरूप आहे |
---|---|
भुजगशयनं | शेष नागावर शयन करणारा |
पद्मनाभं | श्री विष्णूच्या नाभीपासून निघालेले कमळ |
सुरेशं | देवांचा देव, सर्व श्रेष्ठ देव |
विश्वाधारं | जो सर्व (पूर्ण) विश्वाचा आधार आहे |
गगनसदृशं | जो आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे |
मेघ | मेघ, ढग |
वर्णं | रंग किंवा स्वभाव |
शुभाङ्गम् | जो आकर्षक सौंदर्याचा आहे |
लक्ष्मीकान्तं | लक्ष्मीपती आहे. (लक्ष्मी नशिब, यश, वैभव आणि चमक व्यक्त करते) |
कमलनयनं | ज्याचे कमलनेत्र आहेत |
योगिभिर्ध्यानगम्यन्ं | तो योगिजनांना ध्यानामध्ये आविर्भूत होतो |
वन्दे विष्णुं | सर्वव्यापी विष्णुला मी वदन करतो / करते |
भव | जो संसाराची |
भय | भीती |
हरं | नाहीशी करतो |
सर्वलोकैकनाथम् | सर्व विश्वाचा प्रभु |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 3
-
उपक्रम
-
पुढील वाचन