जय जय दुर्गे
ऑडिओ
भजनाचे बोल
- जय जय दुर्गे जय भवानी
- शांभवी शंकरी जय भवानी
- जय जगदंबे जय मांगल्ये
- शांभवी शंकरी जय भवानी
- जय जगद्जननी महा कालिके
- शांभवी शंकरी जय भवानी
भजनाचा अर्थ
दुर्गा, भवानी, शांभवी, शंकरी, काली, जी मंगल आहे त्या दिव्य जगद्जननीचा जयजयकार असो!
व्हिडिओ
स्पष्टीकरण
जय | जयजयकार |
---|---|
दुर्गे | माता दुर्गा, शब्दशः अर्थ पाहिला, तर ‘किल्ला किंवा सर करण्यास अवघड असे ठिकाण’. दुर्गा या शब्दाचा दुसरा अर्थ दुर्गतीनाशिनी असा आहे, ज्याचा शब्दशः अर्थ, ‘दुःख किंवा भोग दूर करणारी’ असा होतो. |
भवानी | माता दुर्गेचे किंवा पार्वतीचे दुसरे नाव. भगवान शंकरांना ‘भव’ या नावाने संबोधले जाते आणि त्यांची अर्धांगिनी म्हणून माता पार्वतीला भवानी म्हंटले जाते |
शांभवी | शिवाची अर्धांगिनी |
शंकरी | दुर्गामातेचे दुसरे नांव. भगवान शिव ज्यांना शंकर ह्या नावानेही संबोधले जाते त्यांची अर्धांगिनी म्हणून तिला शंकरी म्हटले आहे. |
जगदंबे | जगत्+अंबे (जग+माता) म्हणून ह्या नावाचा अर्थ जगन्माता |
मांगल्ये | मांगल्य प्रदान करणारी |
जननी | शब्दशः अर्थ माता |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty