जर प्रेम हा सर्व मानवी मूल्यांचा अंतर्प्रवाह आहे तर अहिंसा परिसीमा आहे, सर्व मूल्यांचे अत्युच्च शिखर आहे.
एकदा आपल्याला विश्वातील जड आणि चेतन घटकांमधील ऐक्याचा बोध झाला की अज्ञान लोप पावते आणि प्रज्ञानाचा उदय होतो. हळूहळू आपल्या अनेक इच्छांची पूर्ती करण्यास आळा घालून अहिंसा आचरणात आणली जाऊ शकते.
अन्न, ऊर्जा, काळ इ. घटकांमधील इच्छांवर नियंत्रण ठेवल्याने मनुष्य आणि निसर्ग ह्यांच्यामध्ये मेळ, सुसंगता राखली जाते.
अष्टपुष्पांच्या मालेतील अहिंसा हे प्रथम पुष्प आहे असे स्वामी सांगतात.
ह्या विभागामध्ये १) मधुर वाणी आणि कटु वाणी आणि २) संतोष आणि शांती ह्या कथांमधून, खरी शांती ही अहिंसा आणि जिव्हेद्वारेसुद्धा मिळते हे तथ्य दर्शवले आहे.