सत्य जेव्हा कृतीतून व्यक्त होते तेव्हा जीवन सदाचरणामध्ये परिवर्तित होते. जेव्हा सत्य शब्दांमध्ये बद्ध होते तेव्हा सदाचरण म्हणजे कृती होय. ह्यावर आधारित वेदांमधून ‘सत्यं वद धर्मं चर’ ही शिकवण दिली आहे. सत्याचे आचरण हाच खरा धर्म म्हणून मनुष्याने स्वतःला धर्माप्रती समर्पित करणे अत्यावश्यक आहे.
बालपणापासूनच सत्याचे आचरण करणे गरजेचे आहे असे केल्याने केवळ व्यक्तिगत नव्हे तर समस्त राष्ट्राची योग्य दिशेने प्रगती होते. जर हृदयात सदाचार असेल तर चारित्र्यात सौंदर्य असेल, जर चारित्र्यात सौंदर्य असेल तर घरामध्ये सुसंवादीत्व असेल, जर घरामध्ये सुसंवादीत्व असेल तर राष्ट्रात सुव्यवस्था असेल आणि जर राष्ट्रात सुव्यवस्था असेल तर जगामध्ये शांती नांदेल.
ह्या विभागामध्ये १) संतांची शिकवण २) साध्या राहणीतील निर्मळ हृदये (मने) ३) बढाईखोर धडा शिकतो आणि साधी राहणी आणि थोर लोकांची शिकवण उदाहरणे देऊन स्पष्ट केली आहेत.