कृतीशील खेळांमुळे मुलांना आपली ऊर्जा अर्थपूर्ण रीतीने मार्गी लावण्यासाठी तसेच समवयस्क मुलांबरोबर प्रभावी परस्पर क्रिया होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतात.
हे खेळ मुलांना समाजशील बनण्यात मदत करतात आणि त्याद्वारे बुजरेपणा, भावनिक कोंडमारा, मनाचीअनिश्चितता यावर मात करण्यास सहाय्य करतात आणि अशा प्रकारे मुलांची परिपूर्ण वाढ व सर्वांगीण विकास यांचे संगोपन करतात . या खेळांमुळे मुलांचे ऐकण्याचे तसेच परस्पर संबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्य विकसित होते, तसेच समन्वय, तालबद्धता, चपळाई, हस्तकौशल्य इत्यादि गुण वाढीस लागतात.
मुले इतरांचे दृष्टिकोन व विचार यांचा आदर करण्यास शिकतात आणि जीवनातील परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक कौशल्यांनी सुसज्ज होतात. आपली पाळी आल्यावरच एखादी गोष्ट करणे अशा काही गोष्टींमुळे हे खेळ मुलांमध्ये समजुतदारपणा, चिकाटी व घाई न करणे हे गुण रुजवितात.
वर्तुळ खेळ मुलांना त्यांच्यातील शक्ती, उत्साह अर्थपूर्ण रीतीने मार्गस्थ करण्यासाठी आणि आपल्या सवंगड्यांबरोबर, मित्रमंडळींबरोबर प्रभावीपणे संपर्कं साधण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करुन देतात.
त्यामुळे मुलांची समग्र प्रगती आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना शिक्षण मिळते. त्याकरता इतरांमध्ये मिसळण्याची संधी मिळाल्यामुळे ते लाजाळूपणा, भावनांना आतल्या आत दाबून ठेवणे आणि संकोच यावर मात करु शकतात. इतरांचे ऐकून घेणे आणि त्यांच्याशी संपर्क करण्याचे त्यांचे कौशल्य वाढीस लागते आणि समन्वय, तालबद्धता, हस्तकौशल्य, चपळता सुधारल्यामुळे, स्थूल हालचालींचे कौशल्य, हातोटी याचे संवर्धन होण्यासाठी त्याची मदत होते.
इतरांच्या मतांचा ते आदर करायला शिकतात आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांना समर्थपणे तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली सामजिक कौशल्ये पण ते आत्मसात करतात. यातूनच एकमेकांना संधी देत असताना (खेळामध्ये) समजूतदारपणा, चिकाटी, सहनशीलता इत्यादी गुण त्यांच्या मनावर बिंबवले जातात.
वर्तुळ खेळामध्ये गटातील मुलांमध्ये काही प्रमाणात जवळीक निर्माण होण्यासाठी उत्तेजना मिळते, प्रोत्साहन मिळते. त्यामुळे मुलांना आवरणे गुरुंना सोपे जाते आणि वर्तुळात बसल्यामुळे एकमेकांना पाहणे आणि ऐकणे मुलांना पण सहज शक्य होते. संगीताचे, ठेक्याचे खेळ मुलांना मनोरंजक असतातच, पण त्याचबरोबर, त्यातील ठेका व लयबद्धतेमुळे मुलांना तालाशी समन्वय साधण्यास मदत होते. तसेच त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते.