गुरुंसाठी महत्त्वाची टिपणे
- खालील मजकूर “Towards Human Excellence of Sri Sathya Sai Education”
- “for School” पुस्तक- ७, “Experiential Learning” ह्या पुस्तकामधून घेण्यात आला आहे.
- हे पुस्तक श्री सत्य साई संस्था, मुंबई ह्यांच्यातर्फे प्रकाशित केले आहे.
- गुरुंना विनंती करण्यात येते की त्यांनी हे पुस्तक पूर्णपणे वाचावे व त्यातील उपक्रमांचा बालविकास वर्गात वापर करावा.
- गुरुंच्या कदाचित हे लक्षात येईल की बालविकासच्या पहिल्या गटाच्या अभ्यासक्रमातील अनुभवजन्य शिक्षण हे मनाचे मापन व तक्ते ह्या पातळीपर्यंत म्हणजेच खाली “पुढे कसे जाल” ह्या शीर्षकाअंतर्गत दिलेल्या पहिल्या चार
मुद्यांपर्यंतच मर्यादित आहे. - तथापि गुरुंना हा उपक्रम व त्याचे फायदे संपूर्णतः समजण्यासाठी ही संपूर्ण कार्यपध्दती येथे दिली आहे.
- ह्यातील जो सिध्दान्ताचा भाग आहे तो केवळ गुरुंना समजून घेण्यासाठी आहे आणि तो वर्गामध्ये पाठ म्हणून शिकवण्याची आवश्यकता नाही ह्याची नोंद घ्या.
- बालविकास वर्गामध्ये फक्त प्रत्यक्ष कृती दाखवा.
- अनुभवजन्य ज्ञानावरील ह्या लेखाच्या शेवटी नमुन्यादाखल एक उपक्रम दिला आहे.
[Adapted from the book ‘Towards Human Excellence Sri Sathya Sai Education for Schools’ Book 7, “Experiential Learning” published by Institute of Sathya Sai Education, Mumbai.]