- फळांच्या भाराने वृक्ष नम्र होतात, नवीन पाण्याने भरलेले मेघ खाली लोंबू लागतात, उदात्त लोक वैभवाने गर्विष्ठ होत नाहीत, परोपकारी लोकांचा हा नैसर्गिक गुणच असतो.
- सर्वसाधारण नियम असा आहे की एखादी व्यक्ती ज्या प्रकारची कर्मे करते त्याप्रमाणे त्याची बरी-वाईट फळे तिला प्राप्त होतात. भगवान् विष्णूंनी वामनावतारामध्ये, बळीराजाला, पाताळात, बंदिवासात अडकवून ठेवले होते, त्याचे फळ म्हणून प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा बंधनात रहावे लागले! कृष्णावतारामध्ये यशोदामातेने एकदा बालकृष्णाला उखळीला बांधून ठेवले होते.
- दुसऱ्याशी प्रेमाने वा ममतेने बोलणे याला का कमत पडत नाही जीभ किंवा ओठ, यांना त्यामुळे फोड येणार नाहीत! मधुर वाण खूप साध्य करू शकते! मधुर आणि स्नेहपूर्ण शब्द दुसऱ्यांनास्ट सुस्वभावी बनवतात. प्रेममय शब्दांची सुंदर प्रतिभा, मानवाच्या आत्म्यावर सुद्धा पडते!
- इतरांमधील दुर्गुण किंवा दोष जे आपल्याला दिसतात, ते दुसरे तिसरे काही नसून, आपल्याच स्वभावांतील दोषांचे ते एक प्रतिबिंबच होय. सत्यनिष्ठ मानवाला या जगात कोणतीच गोष्ट वाईट वा पापी दिसत नाही. त्याच्या हृदयात, जो विशुद्ध आणि नि:स्वार्थी प्रेमाचा साठा असतो, त्यामुळे त्याला कोणातही दोष आढळून येत नाहीत. खरोखर हे प्रेम क्रियाशील असते. तेथे तिरस्काराला वा नापंसतीला वावच नसतो.
- एखादा माणूस खूप बोलका असू शकतो. पण कवळ त्यामुळे त्याला ‘सुज्ञ माणूस’ असे म्हणता येणार नाही. सहनशील, प्रेमळ व कोणाचा द्वेष न करणाऱ्या माणसाला अज्ञ म्हणतात.
- माणसाचे कर्तव्य नक्की काय ? पहिले त्याने आपल्या माता पित्याशी प्रेमाने, आदराने व कृतज्ञतेने वागले पाहिजे. दुसरे सत्यं वद। धर्मं चर। खरे बोला व धर्माने वागा. तिसरे – जेव्हा तुम्हाला काही फुरसतीचे क्षण मिळतील तेव्हा प्रभूचे जे रूप तुमच्या मनात आहे त्याचे नाम घ्या. चवथे – इतरांविषयी वाईट बोलण्यात रमू नका किंवा इतरांचे दोष शोधण्याचा प्रयत्न करू नका. सरतेशेवटी इतरांना कोणत्याही स्वरूपात दुःख देऊ नका.
- कोणीही इतका श्रीमंत नसतो की त्याला दुसऱ्याच्या मदतीची लागणार नाही. कोणीही इतका गरीब नसतो की जो आपल्या बाधवांन कोणत्या तरी प्रकारे उपयोगी पडणार नाही. विश्वासान दुसऱ्याकडून का मदत मागण्याची प्रवृत्ती आणि दयाळूपणे ती देणे हा आपल्या स्वभावाचा एक भाग असतो.
- शब्दातील दयाळूपण विश्वास निर्माण करतो, गांभीर्य निर्माण करतो, दानातील दयाळूपण प्रेम निर्माण करतो.
- तुमच्या प्रार्थनेला विसरू नका, जर तुमची प्रार्थना मनापासून केलेली असेल तर प्रत्येक वेळी तिच्यात नवीन भाव येईल आणि त्यामुळे नवे धैर्य प्राप्त होईल. तुम्हाला मग कळेल की प्रार्थना म्हणजे शिक्षण आहे.
- ईश्वर तुमच्या प्रार्थनेतील वक्तृत्व पहात नाही; मग ते कितीही उत्कृष्ट असो! तुमच्या प्रार्थनेतील भूमिती पहात नाही; मग ती (प्रार्थना) कितीही लांबलचक असो! किंवा त्यातील गणितही पाहात नाही; मग त्यांची संख्या कितीही असो! तुमच्या प्रार्थनेतील तर्क तो बघत नाही मग ती कितीही पद्धतशीर असो! फक्त त्यातील तळमळ तो पहातो !
- ज्याचे प्रेम मोठे, प्रार्थना त्याची श्रेष्ठ! प्रेम सर्वांवर !
मोठ्या किंवा लहानांवर.
प्रिय ईश्व र प्रेम करतो सर्वांवर!
ज्यांना निर्माण केले त्या सर्वांवर ! - प्रश्न: तुम्हाला आवडेल त्या प्रकाराने त्याची प्रार्थना करा.
उत्तर: तुम्हाला आवडेल त्या प्रकाराने त्याची प्रार्थना करा.
कारण तो ती नेहमीच निश्चितच ऐकतो! तो मुंगीच्या पावल ऐकू शकतो! - प्रश्न: प्रार्थनेत खरोखर काही सामर्थ्य आहे का?
उत्तर: होय. जेव्हा मन आणि वाचा एक होऊन कळवळीने एखाद्या गोष्टीविषयी मागणे मगतात तेव्हा ती प्रार्थना फलद्रुप होते. एखादा मनुष्य केवळ वाचेने शब्द उच्चारतो की देवा, हे सर्व तुझेच आहे. आणि त्याच वेळी मनात विचार आणतो की हे सर्व स्वत:चे आहे. - जिथे भगवंताची वसती आहे त्या हृदयातून प्रार्थना निर्माण झाली जिथे सिद्धांत व संशय यांचा झगडा चालतो त्या मस्तकातून
- प्रार्थनेने माझे प्राण वाचविले आहेत. तिच्याशिवाय मी केव्हाच देडा झालो असतो. अत्यंत कटू असे सार्वजनिक व खासगी अनुभव माझ्या वाट्याला आले. त्यामुळे मी तात्पुरता निराशेच्या गर्तेतही फेकला गेलो. त्या निराशेला मी बाजूला करू शकलो ते केवळ प्रार्थनेमुळे!
- लोकांशी बोलताना ज्या गोष्टींबद्दल मतभिन्नता आहे. त्यांची चर्चा करून सुरुवात करू नका. ज्या बाबतीत मतैक्य आहे तिच्यावर भर देत सुरुवात करा व त्यावर भर देतच रहा.
- पिकलेले फळ जमिनीवर पडताना आपल्या लक्षात आले नाही तर वाया जात नाही तर स्वत:चे बीज भूमातेला पुन्हा दुसऱ्यांसाठी फळ म्हणून निर्माण होण्यासाठी परत करते. सज्जन मनुष्य ही भगवंताची
- शारीरिक दुःखे हलकी करण्यासाठी आनंदजनक विचारासारखा वैद्य नाही.
- जग हा एक आरसा आहे प्रत्येक माणसाला तो आपापला चेहरा दाखवितो. तुम्ही त्याच्याकडे आठ्या घालून पहा; तोही तुमच्याकडे तसेच चिडून पाहील. तुम्ही त्याच्या कडे पाहून हसा त्या हसण्याबरोबर तो तुमचा आनंदी व दयाळू सोबती हाईलं. म्हणून सर्व लहान मुलांनी निवड करावी. (कोणते प्रतिबिंब हवे? याची निवड)
रत्ने
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0
The curriculum is empty